धाराशिव : संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा कार्यकारणी तसेच तालुका कार्यकारिणीच्या आज काही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शहरामध्ये शासकीय विश्रामगृह येथे आज सकाळीं सर्वांनी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष आकाश (भैय्या ) मुंडे यांनी नियुक्त पत्र देऊन कार्य करण्याची घोषणा केली आहे. त्यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील , मराठा सेवा संघ शहराध्यक्ष महेश इंगळे, दळवी सर कार्यक्रमाला सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून जिजाऊ वंदना कार्यक्रमाची सुरुवात झाली. संभाजी ब्रिगेड ही खूप वर्षापासून जुनी असलेली संघटना आणि फुले आंबेडकर शाहू विचारांचा वारसा घेऊन चालत असलेली संघटना आहे. यामध्ये असणारे नियुक्ती करताना त्यांचे प्रथमतः सामाजिक कार्य व्यसनापासून दूर अशा गोष्टींचा पारदर्शक पने विचारात घेऊन. नियुक्ती केल्या जात आहेत वरील नियुक्तही प्राथमिक स्वरूपात केलेल्या असून या कार्यक्रमासाठी तालुक्यातील तसेच शहरातील मोठ्या संख्येने संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी जिल्हाध्यक्ष व पाटील सरांच्या हस्ते खालील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊनबाळासाहेब कालिदास शिंदे तालुका उपाध्यक्ष ,शाहनवाज शाहीदा उस्मान सय्यद जिल्हा संघटक ,संभाजी नाना रुक्मिणी फरताडे जिल्हा कार्याध्यक्ष, शुभम लतिका तात्यासाहेब चव्हाण शहराध्यक्ष,अमर लक्ष्मी दिलीप घोडके शहर संघटक, संतोष लाकाळ तालुका कार्याध्यक्ष, आदित्य शीला संभाजीराव देशमुख जिल्हा सचिव बाळासाहेब गाडेकर जिल्हा उपाध्यक्ष,पवन आवटे शहर कार्याध्यक्ष, मनोज मोरे तालुकाध्यक्ष यांची निवड करण्यात आली आहे.
सामाजिक कार्य करत असताना समाजातील अडचणींना हाताशी धरून. तरुणांना व्यवसाय मध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी कसे करता येईल याकडेही भविष्यात मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रम राबवले जातील अशी या कार्यक्रमांमध्ये सविस्तर चर्चा झाली. नियुक्ती केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आपले सामाजिक चळवळीमध्ये मोलाचे योगदान करून संघटना वाढवण्यासाठी नवरात्र प्रयत्न करावे असेही जिल्हाध्यक्षांनी सांगितले आहे.

