धाराशिव : कडकनाथवाडी येथील रहिवासी व सध्या भूम येथील राजीव गांधी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. सुहास गांधले सर यांना मराठी विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांच्या मूळ गावी कडकनाथवाडी येथे सत्कार करण्यात आला. डॉ. सोपानराव सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. गांधले यांनी आपला प्रबंध सादर करून मराठी विषयात डॉक्टरेट पदवी संपादन केली. या यशाबद्दल भिमनगर येथे आयोजित सत्कार समारंभात गावकऱ्यांनी व मित्रपरिवाराने त्यांचा सन्मान केला. या कार्यक्रमाला महेंद्रकुमार गांधले, माजी सरपंच शंकर गांधले, बाळासाहेब शिलवंत, धनंजय धावारे, शामकांत गांधले, प्रदीप शिलवंत, संदीप धावारे, संजय गांधले, विजय शिलवंत, धनंजय शिलवंत, राहुल गांधले, सुनिल गांधले, विनोद ओव्हाळ, रवि गांधले, इसा धावारे, सुशिल ओव्हाळ, बालाजी गायकवाड, उत्तम शिलवंत, संजय लोढे, भालेराव श्रीराम यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमात प्रा. गांधले यांच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेत त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

