तुळजापूर : “समग्गानं तपो सुखो” — अर्थात एकत्र साधना करण्यातच खरे सुख आहे, या विचारातून तुळजापूर येथे एक दिवसाचे विपश्यना ध्यान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबिर दि. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत होणार असून, तुळजापूर-बार्शी रोडवर पावन रिसॉर्टच्या उजव्या बाजूस, डोंगराकडे दोन किलोमीटर अंतरावर असलेले ६० फूट लांब व ३० फूट रुंदीचे शेड.
शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या साधकांनी आपले नाव, त्यांनी केलेल्या १० दिवसांच्या शिबिरांची संख्या आणि मोबाईल क्रमांक ही माहिती ट्रस्टचे सेक्रेटरी बाबासाहेब जानराव (मो. 8830121193 / 9421098597) यांना पाठवावी.
या शिबिरात ज्यांनी म्यानमारचे दादागुरू सयाजी ऊबा खीन यांच्या परंपरेनुसार व विश्वविपश्यना आचार्य सत्यनारायण गोयंका यांच्या शिकवणुकीनुसार किमान एक १० दिवसांचे शिबिर पूर्ण केले आहे, फक्त तेच साधक सहभागी होऊ शकतात. शांती, समाधी आणि आत्मपरीक्षणाचा अनुभव घ्यायचा असेल, तर या शिबिरात सहभागी होण्याची ही एक उत्तम संधी साधकांसाठी उपलब्ध झाली आहे.
