धाराशिव : धाराशिव येथील सामाजिक संघटना शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या सन 2025-26 या वर्षाकरिता जिल्हा व शहर कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण वार्षिक बैठकीत जिल्हाध्यक्षपदी अमोल सिरसट तर धाराशिव शहराध्यक्षपदी संतोष घोरपडे यांची एकमताने निवड करण्यात आली.
बैठकीत निवड करण्यात आलेल्या धाराशिव जिल्हा कार्यकारिणीमध्ये पुढील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे :
उपाध्यक्ष : हनुमंत यादव, सचिव : आकाश भोसले, कार्याध्यक्ष : मनोज मोरे, सहकार्याध्यक्ष : अमोल साळुंके, संघटक : सतीश थोरात, सहसंघटक : सचिन उमाप, कोषाध्यक्ष : सचिन पाटील,सहकोषाध्यक्ष : राजेंद्र मोरे,प्रवक्ता : राहुल घोडके, सहप्रवक्ता : अविनाश अंधारे, प्रसिद्धी प्रमुख : लहू शिंदे, सहप्रसिद्धी प्रमुख : विशाल घोडके,सोशल मीडिया प्रमुख : महेश कळमकर,विनोद प्रमुख : विनोद कावळे,कायदेशीर सल्लागार : अॅड. जयप्रकाश साळुंके
धाराशिव शहर कार्यकारिणीमध्ये पुढील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली :
शहराध्यक्ष : संतोष घोरपडे,उपाध्यक्ष : भैरवनाथ रणखांब,सचिव : ऋषिकेश काळे,कार्याध्यक्ष : अविनाश रणखांब,सहकार्याध्यक्ष : उदय गायकवाड,संघटक : प्रथमेश जगदाळे,सहसंघटक : आदित्य मुंडे,कोषाध्यक्ष : अनंत झाडके,सहकोषाध्यक्ष : लखन क्षीरसागर,प्रवक्ता : रामानंद माडेकर,सहप्रवक्ता : केदार जाधव,प्रसिद्धी प्रमुख : योगेश रायबान,सहप्रसिद्धी प्रमुख : अनिल अंकुश,सोशल मीडिया : सुजित मगर, प्रदीप लोमटे,कायदेशीर सल्लागार : अॅड. महेश गायकवाड
या निवड प्रक्रियेसाठी समितीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोषात आनंद व्यक्त केला.
समितीच्या नव्या कार्यकारिणीकडून येणाऱ्या वर्षात विविध उपक्रमांद्वारे शिवराज्याभिषेक सोहळ्याची परंपरा अधिक भक्कम करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

