धाराशिव/रांजणी : नॅचरल शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि. साईनगर रांजणी या कारखान्याने त्यांचे दोन्ही युनिटमधील सर्व कर्मचा-यांना दिवाळी सण आनंदाने साजरा करता यावा म्हणून बोनस कायद्यानुसार 8.33 टक्के बोनस व चालु गळीत हंगामात निर्धारीत उद्दीष्ट पुर्ण करणेसाठी 16.67 टक्के बक्षीस जाहीर केले असून बोनस व बक्षीस मिळून एकूण 25 टक्के रक्कम कर्मचा-यांचे संबंधीत श्री साई पतसंस्थेचे खात्यामध्ये जमा केली असल्याचे कृषीरत्न बी.बी.ठोंबरे, संस्थापक अध्यक्ष नॅचरल उद्योग समुह यांनी सांगितले.
नॅचरल शुगरने मराठवाडा व विदर्भामध्ये कर्मचा-यांना सर्वाधीक बोनस देण्याची परंपरा कायम ठेवली असून सर्व कर्मचा-यांनी त्यांची बोनसची रक्कम आपआपले बॅंक खात्यावरून उचलून घ्यावी असे आवाहन नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कृषीरत्न बी.बी.ठोंबरे यांनी केले.

