धाराशिव : महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड टीचर्स असोसिएशन (मुप्टा), जिल्हा धाराशिव यांच्या वतीने औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ नोंदणी तसेच संघटना बांधणीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक शनिवार, दि. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ४ वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन, गोरे कॉम्प्लेक्स, धाराशिव येथे पार पडणार असून जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती अपेक्षित आहे.
या बैठकीत संघटनेचे संस्थापक सचिव प्रा. सुनिल मगरे, डॉ. संभाजी वाघमारे, डॉ. भास्कर टेकाळे, राजेंद्र जाधव, शिवराम म्हस्के व डॉ. समीउल्ला खान मार्गदर्शन करणार आहेत. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ नोंदणीची सद्यस्थिती, संघटनेची वाढ, स्थानिक स्तरावरील संघटनात्मक बळकटी, तसेच शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे.
मुप्टाच्या माध्यमातून वंचित व दुर्लक्षित शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने संघटना सातत्याने कार्यरत आहे. त्यादृष्टीने जिल्हास्तरीय समन्वय मजबूत करण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
बैठकीच्या आयोजनासाठी प्रा. रवी सुरवसे, एम. जी. पवार, प्रा. अंबादास कळासरे, सचिन ताकपिरे, प्रा. बालाजी कऱ्हाडे, प्रा. बलभीम ओहाळ, प्रा. विनोद कांबळे, प्रा. संजय मिसाळ, प्रा. सोमनाथ कसबे, संजय क्षीरसागर, मोरे दिलिप, बापू भंडारे, चव्हाण दिलिप, प्रा. डॉ. कुणाल वन्नंजे, ओहाळ शंकर, प्रा. डॉ. नरेंद्र कुंभार, प्रा. सतिश कोल्हे, सचिन भांडे, मस्के सी.के., तुपारे रजनिकांत, ओगले सचिन, प्रा. डॉ. विनोद आचार्य, सय्यद इनामदार, समुद्रे राहुल, त्रिशाला ठाणांबीर, शामल ताकपिरे व डॉ. रत्नाकर म्हस्के यांनी आवाहन केले असून सर्व कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

