#धाराशिव: तालुक्यातील #जुनोनी #ग्रामपंचायतीचे #उपसरपंच #इरशाद शेख यांनी #पालकमंत्री #प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत #शिवसेनेचा #भगवा हाती घेत पक्षात प्रवेश केला. यामुळे शहरासह ग्रामीण भागातील राजकारणाला नवे वळण मिळणार आहे.
शेख यांचा #ग्रामीण भागातील #जनतेशी दांडगा #संपर्क आहे. सामाजिक कार्यातली निष्ठा आणि विकासासाठीची प्रामाणिक धडपड लक्षात घेता त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेना संघटनेला ग्रामीण पातळीवर निश्चितच नवं बळ मिळाले आहे.

या प्रवेशप्रसंगी युवासेना धाराशिव #लखन गायकवाड, #अक्षय गरड, #ॲड. तुकाराम शिंदे (#राज्य आंदोलन #समन्वयक व #शिक्षक सेना #राज्य #उपाध्यक्ष ) उपस्थित होते. पक्षात प्रवेश घेतल्यानंतर इरशाद शेख यांनी शिवसेनेच्या विचारधारेनुसार जनतेची सेवा करण्याचा संकल्प व्यक्त केला . पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या प्रवेशाचे स्वागत करत , ” जनतेच्या प्रश्नांसाठी कार्यरत राहा आणि ग्रामीण भागातील विकासासाठी सक्रिय भूमिका निभवा, ” असे आवाहन केले . इरशाद शेख यांच्या प्रवेशामुळे जुनोनी परिसरात तसेच संपूर्ण धाराशिव तालुक्यात शिवसेनेच्या संघटनेला नवी ऊर्जा मिळाल्याची प्रतिक्रिया स्थानिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे .


