उमरग्यात विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
उमरगा (आकाश पोतदार): शहरातील काँग्रेस कार्यालयात आज विविध पक्ष व सामाजिक संघटनांतील पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात भव्य जाहीर प्रवेश सोहळा व पदनियुक्ती समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आणि उमरगा-लोहारा विधानसभा प्रभारी कल्याणजी पाटील, धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड.धीरज पाटील, तसेच धाराशिव जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व युवा नेते अशलेष मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या प्रसंगी शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच इतर विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांतील माजी नगरसेवक, पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून पक्षाच्या ताकदीत भर घातली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरगा तालुका काँग्रेस अध्यक्ष अर्जुन बिराजदार होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस विजय वाघमारे, तालुका कार्याध्यक्ष एम. ओ. पाटील, नाना भाऊ भोसले, मधुकर यादव, जिल्हा सचिव संजय सरवदे, शहराध्यक्ष विजय दळगडे, लोहारा तालुका अध्यक्ष शामसुंदर तोरकडे, जेष्ठ नेते ॲड. दिलीप सगर साहेब, ॲड. पोतदार, कार्याध्यक्ष अभिषेक औरादे, सतीश जाधव, मधुकर बिद्री, तालुका उपाध्यक्ष राहुल वाघ, ॲड. सयाजी शिंदे, अल्पसंख्याक सेल तालुका अध्यक्ष याकूब लदाफ, विधी सेल तालुका अध्यक्ष ॲड. एस. पी. इनामदार, शिवाजी गायकवाड, सेवादल जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पवार, शहराध्यक्षा सौ. ललिता सरपे, निजाम व्हनताले, कमलाकर मम्माळे, राहुल सरपे, युवक शहराध्यक्ष सोहेल इनामदार, बंजारा सेल तालुका अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सेवादल शहराध्यक्ष बाबा मस्के, सेवादल तालुका अध्यक्ष दिलीप पवार, प्रफुल्ल गायकवाड, साखरे अप्पा जेवळी, बालाजी मोरे, गणेश मोरे, दत्ता चिंचोले, बलभीम अंबुलगे, भीमाशंकर लाव्हारे, ज्ञानेश्वर अशोक पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष ॲड. इरफान जमादार, सचिन गुरव, व्यंकट पवार, सुधीर व्यंकट पाटील, अभिमन्यू भोसले, हसन गुलाब फकीर, बसवराज स्वामी हिरेमठ, जालिंधर सोनटक्के, दयानंद पाटील, जीवन सरपे, समद वरनाळे, निसार मसलगे, रफिक जवळगे, बेबी सरोजा गुरबसया स्वामी, विशाल काणेकर, नितीन कोराळे, महेश जाधव, जयवंत मोरे, बालाजी मीसाले सरपंच, संकेत वाघमारे, अविनाश माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते ख्वाजा मुजावर, माजी नगरसेवक शिंदे गट जयश्री ताई संजय चव्हाण, संभाजी ब्रिगेड प्रवक्त्या रेखाताई सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती ताई रजपूत, सचिन सुतके, महेश गायकवाड, योगेश माने यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन गुरव यांनी केले, तर आभार प्रदर्शन अर्जुन बिराजदार यांनी मानले.या भव्य प्रवेशामुळे उमरगा तालुक्यात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद आणि जनाधार अधिक दृढ झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

